

Haryana-based tractor driver Prithvi Singh celebrating after winning ₹10 crore in the Punjab Dear Lottery Lohri Makar Sankranti Bumper 2026.
esakal
हरियाणातील सिरसा येथील पृथ्वी सिंग रातोरात करोडपती बनला आहे. ट्रॅक्टर ड्राव्हरचे काम करुन आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या पृथ्वी सिंगने पंजाब राज्य डिअर लॉटरी लोहरी मकर संक्रांती बंपर २०२६ मध्ये १० कोटी रुपयांचेपहिले बक्षीस जिंकले. पृथ्वी सिंगच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या कुटुंबाने ढोल-ताशांच्या गजरात आणि नोटांच्या हारांनी त्याचे स्वागत केले. लोकांनीही त्यांचे अभिनंदन केले.