

Viral Video:
Sakal
प्रत्येकजण स्वतःसाठी कमावतो. प्रत्येकजण आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करतो. प्रत्येकजण भविष्यासाठी बचत देखील करतो, परंतु जेव्हा कोणी दुसऱ्याच्या मुलांसाठी हे सर्व करतो तेव्हा ते मानव नसून देवदूत असतात. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बिरप्पा अंडागी यांनी 24 शाळकरी मुलांसह 40 लोकांसाठी देवदूत असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांनी या सर्व लोकांना पहिल्यांदाच स्वतःच्या खर्चाने विमानाने प्रवास कऱण्याचा अनुभव दिला. बिरप्पा अंडागी यांचे हे दयाळूपणाचे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.