
Viral Video : 'मी तुझी सेवक नाही'; विमानातंच एअर होस्टेस प्रवाशाला भिडली
इंडिगो विमानातील प्रवासी आणि महिला कर्मचाऱ्याच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचारी महिला प्रवाशाला भांडताना दिसत आहे. "मी तुझी सेवक नाही, मी कर्मचारी नाही" असंही ती त्याला बोलताना दिसत आहे. इस्तंबूल ते दिल्ली दरम्यान प्रवास करताना हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
दरम्यान, १० डिसेंबर रोजी इस्तंबूल फ्लाईटमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. जेट एअरवेजचे CEO संजीव कपूर यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, "कर्मचारी हेसुद्धा माणसंच असतात. तिला या क्षणापर्यंत पोहचायला खूप वेळ लागला असेल. प्रवाशांकडून अनेक वेळा कर्मचाऱ्याना शिवीगाळ किंवा मारहाण होत असाताना मी पाहिलं आहे. त्यांना नोकर म्हटलं जातं. पण सध्या ती मुलगी ठीक असेल अशी आशा आहे."
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारी प्रवाशाला म्हणते की, तुम्ही माझ्याकडे बोट दाखवून बोलत आहात आणि तुमच्यामुळे माझी सहकारी रडत आहे. आम्ही तुम्हाला जे हवंय ते सर्व करतो, तुम्ही कर्मचाऱ्यांना असं बोलू शकत नाही, आम्ही कर्मचारी आहोत तुमचे सेवक नाही" असं ती प्रवाशाला बोलताना दिसत आहे.