Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

Heart breaking Dog's Loyalty Incident Video: एक नव्हे चार दिवस प्रचंड थंडीत कुडकुडत मालकाच्या मृतदेहाचं संरक्षण करत होता इमानदार श्वान
A loyal dog sits beside its deceased owner in the cold hills of Himachal Pradesh, symbolizing unconditional love and devotion.

A loyal dog sits beside its deceased owner in the cold hills of Himachal Pradesh, symbolizing unconditional love and devotion.

esakal

Updated on

Heartbreaking Loyal Dog Story from Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनुष्य आणि त्याचा सर्वात निष्ठावान प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वान यांच्यातील नातं पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. ज्या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने माणसाला तग धरणे कठीण होते, त्या ठिकाणी एका छोट्या श्वानाने आपली स्वामी निष्ठा दाखवत, चक्क चार दिवस प्रचंड कडाक्या थंडीत आपल्या मालकाच्या मृतदेहाशेजारी दिवस-रात्र बसून घालवले आणि मालकाचा मृतदेह देखील एकटा राहू दिला नाही. ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा बचाव पथकाच्या डोळ्यातही पाणी आले. 

होय हे खरंय.. प्राप्त माहितीनुसार भरमौर येथील भरमानी मंदिराजवळ विक्षित राणा आणि पीयूष नाव असणारे दोन तरूण बेपत्ता झाले होते. नंतर माहिती मिळाली की, प्रचंड बर्फवृष्टीत अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या शोधार्थ सैन्याचे बचाव दल आणि काही स्थानिक ग्रामस्थ निघाले होते. प्रचंड थंडी असल्याने त्या भागात माणसाला टिकणंही अवघड होतं. सर्वत्र बर्फ पडत होतो, अगदी हाडं गोठवणारी थंडी त्या भागात होती.

बचाव पथक जेव्हा त्या दोन तरूणांचा शोध घेत, त्या परिसरात पोहचले तेव्हा समोर दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात अक्षरशा पाणी आले. त्यांना विश्वासही बसत नव्हता. कारण, एका श्वान त्या दोन तरूणांच्या मृतदेहाजवळ थंडीत कुडकुडत थांबलेला होता. शेजारी मृतावस्थेत पडलेल्या आपल्या मालकाला या श्वानाने चार दिवस एकटं सोडलं नव्हतं.

A loyal dog sits beside its deceased owner in the cold hills of Himachal Pradesh, symbolizing unconditional love and devotion.
Viral Video : ‘’मी सहन करू शकलो नाही.., मी राजीनामा दिलाय... ’’, सांगत चक्क जीएसटी उपायुक्त पत्नीशी बोलताना ढसाढसा रडले!

 तेथील त्या अतिशय भावनिक दृशाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तो श्वानं अक्षरशा थंडीने कुडकुडत होता. माणसांनी तरी थंडी वाजू नये म्हणून अंगावर मोठी, जाड जॅकेट परिधान केलेली होती. परंतु तो जीव आहे तसाच तिथे बसून होता. हे पाहून श्वानाची आपल्या मालकाप्रती किती इमानदारी असते, याचाच सर्वांना प्रत्यय आला. त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते.

A loyal dog sits beside its deceased owner in the cold hills of Himachal Pradesh, symbolizing unconditional love and devotion.
KL Rahul retirement talks: केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार? ; जाणून घ्या, त्याने स्वतःच याबद्दल नेमकं काय सांगितलय

अखेर बचाव पथकाने तेथे दाखल होते, त्या दोन्ही तरूणांचे मृतदेह आणि त्या श्वानास हेलकॉप्टरद्वारे आपल्याबरोबर नेले. चार दिवस काहीही न खातापिता किंवा कुठलाही निवाऱ्याचा आसरा न घेता त्या थंडीत, बर्फवृष्टीत बसून त्या मुक्या जीवाने आपल्या मालकाच्या मृतदेहाचेही जंगली प्राण्यांपासून संरक्षण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com