
Pakistan Holi Celebration: पाकिस्तान म्हटलं की तिथल्या धार्मिक अल्पसंख्यांकांवर अर्थात हिंदू समाजाबाबत भेदभावाच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतं असतो. पण खरंच तिथं अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न पडावा असा एक उत्सव इथं साजरा केला जातो. मीठी या भागात हिंदू आणि मुस्लिम समाज एकजुटीनं भावा-भावाप्रमाणं राहतात. या ठिकाणी उत्तर भारतात खेळला जातो तो होळीच्या रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो.