
Nagesh Madke: मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकालाच सध्या 'हॉटेल भाग्यश्री' हे नाव माहिती आहे. दररोज दहा ते वीस बोकडं कापून अडीचशे रुपयांमध्ये थाळी देण्याच्या उपक्रमामुळे हे हॉटेल व्हायरल झालं आहे. हॉटेल मालक नागेश मडके यांचे इन्स्टाग्रामवर तीन लाख फॉलोअर्स आहेत. वरचेवर त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यामुळे त्यांना इतर कार्यक्रमांच्या सुपाऱ्या मिळताहेत.