
hotel bhagyshree
मराठवाड्यातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने एक अनोखा निर्णय घेतला आहे. हॉटेलने या संपूर्ण महिन्यासाठी नॉनव्हेज पदार्थ बंद करुन ग्राहकांसाठी २५० रुपयांत विशेष व्हेज थाळी लाँच केली आहे. यासंबंधीचा मालक नागेश मडके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्यांच्या या पावलाचे कौतुक केले आहे. “भाऊ, खूप खूप धन्यवाद! एक महिना श्रावण पाळल्याबद्दल,” अशा कमेंट्सनी सोशल मीडिया गाजला आहे.