

shivaji maharaj viral video
esakal
प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडलेली ती ऐतिहासिक भेट... आज ४६६ वर्षांनंतरही जेव्हा आपण त्या प्रसंगाचा विचार करतो, तेव्हा रक्त सळसळते. अफजल खानाचा कोथळा बाहेर पडलेला तो क्षण आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने पुन्हा जिवंत झाला आहे. अमोल बोरुडे या तरुणाने तयार केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.