

Shivaji Maharaj Video
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला, याचे थरारक चित्रण करणारा एक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयने तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताना प्रेक्षकांना शिवरायांच्या काळातील वातावरण जणू डोळ्यासमोर येते. घनदाट जंगल, मावळ्यांच्या हालचाली आणि संपूर्ण दृश्य एआयच्या माध्यमातून इतके जिवंत वाटते की, इतिहासातील त्या क्षणांची कल्पना सहजतेने येते.