

IndiGo ticket cancellation refund process
esakal
IndiGo Flight News : इंडिगो एअरलाइन्सच्या सततच्या फ्लाइट डिले आणि कॅन्सल होण्यामुळे हजारो प्रवासी हैराण झाले आहेत. विमान उशिरा निघते, रद्द होते, पर्यायी फ्लाइट मिळत नाही आणि जास्त भाडे देऊनही प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. अशा परिस्थितीत अनेकांनी आपली ट्रिप रद्द करून तिकीटाचे पैसे परत मागितले आहेत. चांगली बातमी अशी की आता घरबसल्या फक्त २-३ मिनिटांत तुम्ही स्वतः विमान तिकीट रद्द करू शकता आणि पूर्ण किंवा जवळपास पूर्ण परतावा मिळवू शकता.