
पत्नीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळलेल्या पतीने तिचा हात प्रियकराच्या हातात देत सुखी संसार करण्याचा आशिर्वाद दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे पतीला कळाले, त्याने याला विरोध केला मात्र पत्नीने ऐकले नाही. पतीने पत्नीच्या हट्टापुढे हार मानली आणि गावासमोर पत्नीचा प्रियकराच्या हातात हात देत दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तब्बल १८ वर्षांनी पती आणि पत्नीपासून वेगळे झाले. पत्नी आणि तिच्या प्रियकराला सुखाने संसार करण्याचा आशिर्वादही दिला. पतीच्या या कृतीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.