

तुम्ही आतापर्यंत जमीन किंवा पैशाची वाटणी झालेली पाहिली असेल पण कदाचित नवऱ्याची वाटणी झाल्याचे पहिल्यांदाच ऐकले असेल, पण असंच घडलं आहे. एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले, पण त्याचे बिंग फुटले आणि दोन्ही बायकांनी गोंधळ सुरु केला. आता नवऱ्याची वाटणी झाली आहे. ही वाटणी सप्ताहातील सात दिवसांच्या आधारावर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पतीला या वाटणीत एक दिवसाची सुट्टी देखील देण्यात आली आहे.