

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये पती-पत्नी मातीच्या घराच्या छतावर उभे राहून एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. नवरा रागात काहीतरी बोलत आहे, तर पत्नीही उलट उत्तर देत आहे. काही क्षणातच वातावरण इतके तापते की पत्नी अचानक पतीला जोरात धक्का देते. आणि तो आधी छपरावर नंतर खाली कोसळतो. ही घटना इतकी अचानक घडते की पाहणाऱ्यांना धक्काच बसतो.