
Zomato delivery boy falls into open drain during heavy rain in Hyderabad: हैदराबादेत मुसळधार पावसात फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉयसोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे कंपन्यांची कार्यशैली आणि फूड डिलिव्हरी वर्कर्सचाय सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी झोमॅटोची ऑर्डर पूर्ण करणारा सय्यद फरहान एका रस्त्यावरील उघड्या गटारात त्याच्या दुचाकीसह पडला.
यामध्ये त्याचा मोबाइल पाण्यात वाहून गेला, त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले अन् त्यालाही दुखापत झाली. ही दुर्घटना समोर आल्यानंतर फूड डिलिव्हिरी बॉयच्या सुरक्षेतेबाबत अधिकच चर्चा सुरू झाल्या. अशावेळी तेलंगणातील गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियने हा मुद्दा उचलून धरला आणि कंपनीकडे उत्तरदायित्वाची मागणी केली.
युनियनचे प्रमुख शेख सलाउद्दीन म्हणाले, "हा केवळ अपघात नाही तर कामगारांच्या सुरक्षेपेक्षा नफा जास्त असलेल्या धोरणांचा परिणाम आहे. जरी फरहानचा जीव वाचला असला तरी, पुढच्या वेळी दुसरा कोणताही कामगार इतका भाग्यवान नसेल."
सलाउद्दीनने कंपनीकडून फरहानचा फोन बदलण्याची आणि त्याची बाईक दुरुस्त करण्याची आणि डिलिव्हरीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची मागणी केली आणि कामगारांच्या जीवनाचे मूल्य १० किंवा १५ रूपयांच्या रेन बोनसने मोजता येत नाही, असं सांगितलं.
युनियनचे म्हणणे आहे की, गिग वर्कर्सच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे, पाऊस आणि सर्ज बोनस योग्य आणि पारदर्शक केले पाहिजेत. वास्तविक हवामान डेटा सामायिक केला पाहिजे जेणेकरून वर्कर्स माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.
तसेच, TGPWU ने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेला आवाहन केले आहे, ज्या कंपन्यांना डिलिव्हरीची सक्ती केली आहे त्यांच्यावर कारवाई करा. GHMC ने आधीच कंपन्यांना इशारा दिला होता. तर, युनियनचे म्हणणे आहे की या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.