

India’s innovative hydrogen cooking stove uses water and electricity to produce clean fuel, offering a sustainable alternative to traditional LPG gas.
esakal
मध्य पूर्वेतील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर संकटाचे सावट पसरले आहे. देशात एलपीजीचा तुटवडा टाळण्यासाठी सरकारने गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सध्या देशात घरगुती गॅसचा तुटवडा नसला तरी, जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर ही भीती अधिकच वाढली आहे. आता, एका भारतीय कंपनीने एक असा स्वयंपाकाचा स्टोव्ह विकसित केला आहे, ज्याला केरोसिन किंवा गॅसची गरज नाही.