

IAS Aishwaryam Prajapati, who secured All India Rank 10 in the UPSC Civil Services Examination without formal coaching
esakal
लहानपणीच मनात रुजलेले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न, त्यासाठी केलेली सातत्यपूर्ण मेहनत आणि अपयशातून घेतलेला धडा यामुळे ऐश्वर्यम प्रजापती यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या ऐश्वर्यम यांनी कोणत्याही कोचिंग संस्थेची मदत न घेता ऑल इंडिया स्तरावर १०वा क्रमांक मिळवला. स्व-अभ्यास, ऑनलाइन उपलब्ध सामग्री, चाचण्या आणि स्वतः आखलेल्या अभ्यासपद्धतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.