

Thomas Stevens, the first man to cycle around the world, poses with his iconic penny-farthing bicycle during his groundbreaking 1884-1886 global tour that took him through India and the breathtaking Taj Mahal.
esakal
India Historical Moments : काल्पनिक कादंबरीच्या जगातून बाहेर पडून प्रत्यक्षात सायकलवर जगभ्रमंती करणारे पहिले व्यक्ती म्हणजे थॉमस स्टिव्हन्स. 1884 मध्ये सुरू झालेल्या या अविश्वसनीय प्रवासात त्यांनी पेनी फार्दिंग नावाच्या विचित्र सायकलवर हजारो मैल पार केले. ज्युल्स व्हर्नच्या 'अराऊंड द वर्ल्ड इन 80 डेज' सारख्या कादंबरीनंतर अवघ्या काही वर्षांत स्टिव्हन्सनी हे धाडस केले. त्यांचे पुस्तक 'अराऊंड द वर्ल्ड ऑन अ सायकल' जगप्रसिद्ध झाले.