

A cobra snake seen during a dangerous stunt in Uttar Pradesh, where a man was fatally bitten multiple times, highlighting the risks of handling venomous snakes.
esakal
उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका व्यक्तीला कोबरा नागासोबत स्टंट करण्यामुळे जिवाला मुकावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तो ६ फूट लांबीच्या नागासोबत स्टंट करत असताना त्याने एकामागून एक तीन वेळा चावा घेतला. विष त्याच्या शरीरात इतक्या वेगाने पसरले की रुग्णालयात पोहोचण्याआधी त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.