

indian army
esakal
Indian Army: देशवासीयांचा उर अभिमानाने भरुन यावा, अशा गोष्टी कायमच भारतीय सैनिक करीत असतात. एकीकडे देशसेवेसाठी सीमेवर तैनात रहायचं अन् गरज पडली तर देशांत उद्भवलेल्या संकटातही धाऊन यायचं, यामुळे जवानांवर भारतीयांचं प्रेम आहे. एखादा सैनिक ऑफ ड्युटी असेल तरीही आपलं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कधीही विसरत नाही. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या सैनिकाला भारतीयांनी भरभरुन प्रेम दिलं.