Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

Guinness Book Record : आवड आणि कमाई दोन्हीसाठी निवडला टायपिंगचा मार्ग ; नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
guinness world records vinod chaudhary nose typing
guinness world records vinod chaudhary nose typingesakal

Typing Record : वेगवेगळे पराक्रम करून जगाला अचंबित करणारे वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारे अनेक लोक आहेत. ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. भारतातील असाच बहाद्दर आहे ज्याने एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा गिनीज बुक मध्ये नाव नोंदवले आहे.

विनोद कुमार चौधारी या भारतीय व्यक्तीने नाकाने टायपिंग करून सर्वात वेगवान टायपिंग करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याच नावावर केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही किमया एकदा नाही तर तब्बत तीन वेळा केली.

चौधारी यांनी पहिल्यांदा ही कला 2023 मध्ये दाखवली होती. त्यांनी तेव्हा 27.80 सेकंदात नाकाने संपूर्ण इंग्रजी वर्णमाला टायप केली होती. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी वेळ कमी करत 26.73 सेकंदाचा टप्पा गाठला आणि आता त्यांनी तर 25.66 सेकंदात हा विक्रम केला आहे!

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्यांचा हा विक्रम मोडण्याचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडियो शेअर करताना प्रश्न विचारला आहे, "तुम्ही तुमच्या नाकाने किती वेगाने वर्णमाला टाईप करू शकाल?"

guinness world records vinod chaudhary nose typing
World's Youngest Artist : सोशल मीडियावर फेमस झालेला चिमुकला चित्रकार पाहिलात काय? वयाच्या पहिल्या वर्षीच 'गिनीज बुक'मध्ये नोंद

व्हिडियोमध्ये चौधारी जवळच्या अंतरावर आपल्या नाकाने टायपिंग करताना दिसत आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नियमानुसार, संपूर्ण रोमन लिपी (इंग्रजी वर्णमाला) स्टँडर्ड QWERTY कीबॉर्डवर टाईप करावी लागते, तसेच प्रत्येक अक्षरा दरम्यान एक स्पेसही द्यायची असते. हे सर्व चौधारी यांनी अचूकपणे पूर्ण केले आहे.

या विक्रमाबद्दल बोलताना चौधारी म्हणाले, "टायपिंग हे माझे क्षेत्र आहे, त्यामुळेच मी यामध्ये विक्रम करण्याचा विचार केला. जिथे माझी आवड आणि माझा उदरनिर्वाह दोन्ही एकत्र येतात." ते पुढे म्हणाले, "जीवनात तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी आपल्या आवडी जपून राहणे महत्वाचे आहे."

guinness world records vinod chaudhary nose typing
Truecaller AI Scam Scanner : स्कॅमर्सवर लागणार लगाम; ट्रू कॉलरने लाँच केलंय हे नवीन AI फिचर

टायपिंगच्या या वेगवान कौशल्या व्यतिरिक्त, चौधारी यांच्या नावावर एका हाताने 5.36 सेकंदात उलट्या दिशेने वर्णमाला टायप करण्याचा आणि पाठीमागे हात बांधून 6.78 सेकंदात वर्णमाला टायप करण्याचाही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com