
मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक भयानक घटना समोर आली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रेयसी खरगोनची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने तारांमध्ये अडकल्याने तिचा जीव वाचला. तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.