
आजच्या काळात केवळ ९ तासांच्या नोकरीतून घरखर्च भागवणे खूप कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अनेकजण पार्ट-टाइम काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण ८-९ तासांच्या नोकरीनंतर पुन्हा काम करणे सोपे नाही. मात्र, दिल्लीचा शुभम परमार याला विश्रांती म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. ऑफिसमधून मोकळे झाल्यावर शुभमने रॅपिडो ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, तो सोशल मीडियावर सक्रिय राहतो आणि सतत व्हिडिओ बनवून पोस्ट करतो.