

सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. पण असे काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असतात, ज्यांच्याशी नेटकऱ्यांचे भावनिक नाते जोडलेले असते. कारण सोशल मीडिया आज अनेकांचे पोट भरण्याचे साधनही बनले आहे. असेच एक होते, जादूगार शमसुंदर काका. इंस्टाग्रामवर @jadugar_shamsundar या नावाने ओळखले जाणारे शांताराम शामसुंदर इंस्टाग्रामवर जादूचे रिल्स बनवायचे. त्यांनी आपल्या साध्या-सोप्या जादूच्या खेळांनी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले.