IRCTC : रेल्वेचा PNR नंबर आणि रेल्वेचे लाईव्ह स्टेटस WhatsApp वर कसे चेक करावे?

PNR याच्या नावावरून आपल्या लक्षात येते की हा नंबर Passenger च्या प्रवासाचा Record सांगणारा आहे.
Indian Railways
Indian Railways esakal

तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मधील WhatsApp च्या मदतीने PNR आणि Train Live Status चेक करु ईच्छिता? चला तर मग आपण आजच्या या लेखात Step बाय Step पाहू या की WhatsApp च्या माध्यमातून PNR आणि Train Live Status कसे चेक करावे.

Indian Railways
IRCTC News : ट्रेनला उशीर झाल्यास, प्रवाशांना मोफत जेवण

PNR आणि ट्रेनचे Live Status आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहजपणे पाहू शकता.

सगळ्या आधी आपण पाहू या की PNR Status म्हणजे काय आहे? ते नेमके कुठे नमूद केलेले असते. ते किती अंकी असते आणि PNR चा Full Form नेमका काय होता? PNR चा फुल फॉर्म “Passenger Name Record” असा होतो. याचा मराठीत अर्थ प्रवासाच्या नावाचा अभिलेख असा होतो. हा दहा आकडी नंबर असतो.

यातील पहिले तिन आकडे हे सांगत असतात की तुम्ही प्रवासाला सुरूवात कुठून केली आहे. PNR नंबर हा आपल्या टिकिट बुक करतांना मिळत असतो.हा नंबर आपल्या रेल्वेच्या टिकिटाच्या वरच्या डाव्या बाजूला एका बॉक्स मध्ये लिहलेला असतो.

PNR याच्या नावावरून आपल्या लक्षात येते की हा नंबर Passenger च्या प्रवासाचा Record सांगणारा असतो.

यात प्रवास कुठून सुरू केला,प्रवासांच नाव, वय, लिंग या गोष्टीचा समावेश असतो. PNR नंबर चेक करून आपण Seat Confirm आहे की नाही हे पाहू शकतो. आणि सिट नंबर देखील माहिती करून घेऊ शकतो.

WhatsApp वर Train PNR Status पाहण्यासाठी तुम्हाला या Steps फॉलो कराव्या लागतील.

Indian Railways
IRCTC Tour Package: 5,380 रुपयात फिरा राजस्‍थान ; 3 दिवसाचा खर्च उचलणार IRCTC

Step1. WhatsApp वर जर आपल्या Train PNR Status Check करायचे असेल तर पहिल्यांदा  9881193322 हा नंबर आपल्या फोनवर Dial करावा लागेल. हा नंबर Railofy द्वाराच दिला गेला आहे. तुम्ही हा नंबर Dial करूनच WhatsApp द्वारा Train PNR Status चेक करू शकता.

Step 2. मोबाइल नंबर डायल केल्यावर हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये कोणत्यातरी नावाने Save करावा लागेल.

Step 3. नंतर तुम्हाला हा नंबर आपल्या WhatsApp च्या Chat लिस्ट टाकावा लागेल यासाठी तुम्हाला Chat List मध्ये खाली New Chat च्या Icon वर क्लिक करावे लागेल.

Step 4.  आता तुम्हाला वर सर्च Icon वर पुन्हा क्लिक करावे लागेल. आणि सर्च वार मध्ये हा नंबर सर्च करावा लागेल.

Step 5.  हा नंबर सर्च केल्यावर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावे लागेल.

Step 6. आता तुम्हाला तिथे तुमचा PNR नंबर टाइप करावा लागेल.

Step 7. त्यानंतर तुम्हाला Send बटन वर क्लिक करावे लागेल. लगेच मग PNR नंबर Send करावा लागेल.

मेसेज सेंड होताच WhatsApp Bot द्वारा तुम्हाला एक मेसेज येईल ज्यात तुम्हाला PNR च्या सर्व डिटेल्स मिळतील.

Indian Railways
रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश

आता बघू या WhatsApp वर Train लाइव Status कसे पहावे?

जसे आपण WhatsApp वर PNR Status पाहू शकतो

अगदी त्याचप्रकारे आपण WhatsAppवर   ट्रेन लाइव Status सुध्दा पाहू शकतो.

WhatsApp वर ट्रेन लाइव Status पाहण्यासाठी तुम्हाला

या Steps फॉलो कराव्या लागेल.

Step 1. WhatsApp वर ट्रेन चे लाइव Location पाहण्यासाठी तुम्हाला MakeMyTrip हा नंबर 7349389104 तुमच्या मोबाईल मध्ये सेव करावा लागेल.

Step 2. आता तुम्हाला MakeMyTrip (7349389104) या नंबरला तुमच्या WhatsApp च्या Chat List मध्ये आणावे लागेल.

Step 3. आता तुम्हाला वरच्या बाजूला एक सर्च वार दिसेल ,ज्याच्या मदतीने तुम्ही हा नंबर सहजरित्या शोधू शकला.

Step 5. नंबर भेटल्यावर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावे लागेल.

Step 6. आता तुम्हाला Train चा नंबर टाइप करावा लागेल आणि या नंबरवर पाठुन द्यावा लागेल. नंबर सेंड होताच तुम्हाला ट्रेनचे लाइव Status दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com