रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम, दिले कडक कारवाईचे निर्देश

रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांची मनमानी रोखण्यासाठी IRCTC कडून कडक सूचना देण्यात आल्या.
Railway Station
Railway Stationsakal

काही दुकानदार प्रवाशांकडून ठरलेल्या किमतीतून मनमानी पैसे घेत असल्याचे अनेकवेळा रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते. पण ट्रेन पकडण्याच्या घाईत विक्रेत्यांच्या या मुद्द्याकडे प्रवासीही दुर्लक्ष करतात. पण आता भारतीय रेल्वेने या गोष्टींबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांची मनमानी रोखण्यासाठी IRCTC कडून कडक सूचना देण्यात आल्या.

आयआरसीटीसीने सुचना देताना स्पष्ट शब्दात सांगितले, की कोणत्याही विक्रेत्याने प्रवाशांसोबत कोणत्याही प्रकारची मनमानी करू नये आणि जर कोणी विक्रेता असे करताना आढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी.

Railway Station
द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी विजय सोपा; आकड्यांचं गणित काय सांगतं?

देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर विक्रेते प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेकडे येत होत्या. प्रवाशांनी विरोध केल्यानंतरही विक्रेते मनमानी दर आकारत होते. अशा परिस्थितीत रेल्वेने सर्व विभागीय रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवरील मनमानी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. या सुचनेनुसार रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॅकेटमध्ये विकले जाणारे प्रोडक्ट त्याच एमआरपीवर विकले जाणार.

Railway Station
दिल्लीत उष्मा वाढणार, आसाममध्ये पूर; 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

विक्रेत्यांवर दंडाची तरतूद

खाद्यपदार्थांचे दरही निश्चित केले जाणार आहेत. मात्र, मेट्रो सिटी आणि छोट्या शहरातील स्टेशनवर दरात तफावत असली तरी हा दर निश्चित ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विक्रेत्याने त्यांच्या मालाची दर यादी त्यांच्या स्टॉलसमोर लावणे बंधनकारक असेल.

आयआरसीटीसीने याआधीच विक्रेत्यांबाबत समान दर निश्चित करण्याचे नियम केले आहेत, परंतु या नवीन प्रणालीमध्ये जर कोणत्याही विक्रेत्याने नियमांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. याशिवाय विक्रेत्यांकडून दंड आकारण्याचीही तरतूद आहे.

Railway Station
भारतात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ; 24 तासांत 17,336 प्रकरणं समोर

आयआरसीटीसीशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून अशा तक्रारी येत होत्या. भविष्यात प्रवाशांना अशा गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी सर्व विक्रेत्यांना मालाची दर यादी लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याशिवाय आमचे अधिकारी वेळोवेळी स्टेशनवर तपासणीही करतील. प्रवाशांना अशी समस्या असल्यास ते सोशल मीडिया, ट्वीटर आणि हेल्प नंबरच्या माध्यमातूनही त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com