Viral Video : 'बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे'; शेतकऱ्याच्या मुलाची लग्नासाठी पोस्टरबाजी

Viral Video
Viral VideoSakal

जळगाव : प्रत्येकाला आयुष्यात लग्न करून आपापला संसार थाटायचा असतो. वय २५ झालं की प्रत्येकजणाला लग्नाचे वेध लागत असतात. तर अनेकांच्या वयाच्या २५ च्या आधी लग्न होत असते. पण सध्या तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
ऑफिसमधून नवरा आला अन् बायकोने धुतला; नेमकं काय आहे कारण? CCTV Footage Viral

व्हायरल होत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने हातात पोस्टर धरून लग्नासाठी मुलीची मागणी केली आहे. "बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे" असं सदर मुलाने पोस्टरवर लिहिलं आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील उपवर बागायतदाराने नवरदेवाचा पेहराव करत, कपाळावर मुंडावळ्या (बाशिंग) बांधून पाचोरा येथे केलेले अनोखे आंदोलन शहरवासीयांचे लक्ष वेधणारे ठरले आहे.

Viral Video
Karnataka Election : भाजपचा धुव्वा, काँग्रेसचा विजय! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा उपवर बागायतदार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने 'बागायतदार आहे बागायतदारीण हवी' असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले.

हा बागायतदार तरुण १० एकर बागायती शेतीचा मालक व पदवीधर असला तरी तो खेडेगावात वास्तव्यास आहे व त्याला नोकरी नाही म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी मिळत नसल्याने त्याने अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com