
Jalna police viral video of officer kicking protester sparks public outrage: स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं, त्याचवेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयसमोर एक कुटुंबाचं उपोषण सुरू होतं. उपोषण करणाऱ्या कुटुंबीयांनी मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अत्यंत नाराज असणाऱ्या या कुटुंबाने डिझेल अंगावर ओतून घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पोलिसांनी या कुटुंबास ताब्यात घेतलं.
हे सगळं एककीडे सुरू असताना आणि पोलिस त्या कुटुंबातील व्यक्तीला ताब्यात घेवून जात असताना, अचानक डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी पाठीमागून धावत येत, त्या व्यक्तीच्या कंबरेत फिल्मी स्टाईलने उडी मारत लाथ घातली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडिओवरून पोलिसांवर नाराजीच्या कमेंट येत आहेत.
तर या प्रकारावर आता पोलिसांकडूनही स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, ही व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी गेली होती आणि त्याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतलं आणि पोलिसा कर्मचाऱ्याच्या अंगावरही डिझेल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बळाचा वापर केला, असं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी म्हटलंय.
अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. पोलिस दाखल घेत नाहीत, असा त्यांचा आरोप होता. तर आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली आणि आज स्वातंत्र्यदिनी त्या आंदोलकांच्या कमरेत लाथ घातली, असं आता बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.