
Jamsetji Tata Birth Anniversary : 'हा' होता टाटांचा पहिला व्यवसाय, नागपूर अन् टाटांचं काय कनेक्शन?
Jamsetji Tata Birth Anniversary : आज टाटा घराण्याचं नाव जगभऱ्यात कोणालाही माहितीये काय म्हणून विचारलं तर नक्कीच अनोळखी नाही. मात्र ही प्रचिती टाटा घराण्याला एका रात्रीत किंवा एका व्यवसायातूनही मिळाली नाही. आज जमशेदजी टाटा यांची जयंती. जमशेदची टाटा यांचा उद्योजक होण्याचा प्रवासही रंजक आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील त्यांनी सुरु केलेल्या पहिल्या व्यवसायाबद्दल.
जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे पारशी कुटुंबीय पुजारी म्हणून काम करत होते. मात्र, जमशेदजी यांचे वडील नुसरवानजी टाटा हे व्यवसायात उडी घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. वयाच्या 14 व्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जमशेदजी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षांनी 1868 मध्ये त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला.

नेमका काय होता हा व्यवसाय?
जमशेदटजी टाटा यांनी 21000 रुपयांच्या गुंतवणुकीने त्यांची पहिली ट्रेडिंग कंपनी सुरु केली. मात्र काही काळातच ते इग्लंडला गेले आणि तेथून कापड व्यवसायाबाबतची माहिती घेऊन भारतात आले.
नागपूरमध्ये सुरु केली पहिली कापड गिरणी
त्यांनी मुंबईतील औद्योगिक केंद्र असलेल्या गिरणगावातील चिंचपोकळीतील दिवाळखोर झालेली तेल गिरणी विकत घेतली. त्यांनी त्याचे नाव अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. जमशेदजी टाटा यांनी तेल गिरणीचे सूतगिरणीत रूपांतर केले. मात्र त्यांना नफा वाढवण्यासाठी त्यांनी दूरदर्षी दृष्टिकोण स्वीकारला. त्यांनी 1874 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. सुमारे 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
नागपूरची निवड करण्यामागील 3 मुख्य कारणे होती. यामध्ये कापूस निर्मिती करणारे क्षेत्र जवळ असणे, रेल्वे जंक्शन जवळ असणे आणि उद्योगासाठी पाणी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था असणे.
अशी झाली टाटा लाइनची स्थापना
जमशेदजी टाटा यांनी 1873 मध्ये कापड व्यवसायाच्या स्वस्त निर्यातीसाठी एक शिपिंग कंपनी सुरु केली. त्यासाठी त्याने लंडनहून अॅनी बॅरो नावाचे जहाज 1050 पौंड या दराने दर महिन्याच भाड्याला घेतले. जपानच्या Nippon Yusen Kaisha Line सोबत त्यांनी यासाठी Tata Line सुरू केली. मात्र, हा व्यवसाय फारकाळ टिकला नाही.
उद्योग, व्यवसायाची सुरुवात
'टाटा'च्या संकेतस्थळानुसार, टाटा समूहाने देशातील पहिली मोठी स्टील कंपनी सुरू केली. त्याशिवाय पहिले पंचतारांकीत हॉटेल, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू देणाऱ्या कंपनीची स्थापन केली. तसेच देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. टाटा एअरलाइन्सचे नाव 'एअर इंडिया' असे करण्यात आले. समूहातील टाटा मोटर्सने रेल्वे इंजिनचे उत्पादन केले होते.