Baby Monkey Punch Kun Finds Family
ESAKAL
जपानच्या इचिकावा शहरातील एका प्राणीसंग्रहालयातील छोट्या माकडाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या माकडाची कहानी अनेकांना भावूक करते आहे. पंच कून असं या माकडाचं नाव असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
पंच हे माकड अवख्या सात महिन्यांचं आहे. जन्म होताच त्यांच्या आईने त्याला नाकारलं. त्यामुळे त्याला एकटं वाटू लागलं. तसेच त्याच्यात असुरक्षितेची भावना निर्माण झाली. प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी पंचला धीर देण्यासाठी त्याला एक खेळण्यातलं माकड दिलं. हे खेळणं त्याच्यासाठी केवळ खेळणं नाही, तर प्रेम आणि आपलेपणाचं प्रतीक आहे.