
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका दागिन्यांच्या दुकानात काम करणारा एक कारागीर तोंडात १५० ग्रॅम सोने घेऊन पळून गेला. त्याची किंमत १५ लाख रुपये आहे. आरोपीने चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित ज्वेलर्सचे नाव शुभंकर सामंता आहे. त्यांचे चौक सराफा येथील गर्ग मार्केटमध्ये दागिन्यांचे दुकान आहे.