Job Resignation : नोकरीचा राजीनामा दिला की शेवटचा दिवस 'असाच' असतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Resignation

Job Resignation : नोकरीचा राजीनामा दिला की शेवटचा दिवस 'असाच' असतो

Job Resignation : नोकरीचा राजीनामा दिल्यावर जोपर्यंत आपला नोटीस पिरियड पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कसे एकदम निवांत असतो. पण मंडळी एकदा का तो जायचा दिवस आला की, आपल्याला आपला बॉस अजिबात जरी आवडत नसला तरी ऑफिस सोडण्याच्या विचाराने आपलं मन नुसतं भरून येतं...कारण कसंय ना आपल्याला आपल्या त्या सर्व गोष्टी सोडून जाताना वाईट वाटत असतं. जसं की, आपला लॅपटॉप, डेस्क, ऑफिसच्या बाहेर चाय-सुट्टावाले असं बरंच काही...

बऱ्यापैकी थोड्याफार फरकाने प्रत्येकाचा ऑफिसचा दिवस सारखाच असतो. अशाच एका एम्प्लॉयीने त्याच्या ऑफिसच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. खरंतर, हा संपूर्ण सीन रजनीकांतच्या 'शिवाजी द बॉस' सिनेमाच्या एका सीनवर फिट बसवलाय. हा व्हिडीओ पाहिलात की तुम्हाला पण वाटेल की, -अरे माझ्यासोबतही असंच घडलं होतं.

हा व्हिडिओ ट्विटर यूजर @yenceesanjeev ने त्याच्या फिडवर शेअर केलाय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी असंच काहीतरी घडतं. ही बातमी तयार करेपर्यंत या पठ्ठयाला 14 हजारांहून जास्त लाईक्स, 1500 हून अधिक रिट्विट्स आणि व्हायरल क्लिपला 4 लाख 15 हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले होते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असा कोणताच युजर नसेल जो स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकेल. काहींनी लिहिलंय की हे खूपच रिलेटेबल आहे. तुमचा पण ऑफिसचा शेवटचा दिवस असाच होता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.