
राजस्थानमधील जोधपूर शहरात एका स्वयंघोषित तांत्रिक बाबावर गंभीर आरोप लागले आहेत. या व्यक्तीवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका व्हिडिओने खळबळ उडवली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा तथाकथित बाबा फरार झाला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.