अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीची तबल्यावर कमाल! १२ ताल वाजवून आणि म्हणून केला विक्रम; पाहा Video

VIRAL VIDEO OF KARNATAKA TODDLER PLAYING TABLA: कर्नाटकच्या २ वर्षांच्या स्वरश्री हेगडेने १२ ताल वाजवून आणि म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली. पाहा व्हायरल व्हिडीओ!
2 year old baby girl playing tabla with 12 taals

2 year old baby girl playing tabla with 12 taals

sakal

Updated on: 

INDIA BOOK OF RECORDS YOUNG TABLA ARTIST: पहिल्या १-२ वर्षांत लहान मुलं बोलायला, चालायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात. पण कर्नाटकातल्या एका चिमुकलीने इतक्या कमी वयात आपल्या अनोख्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वरश्री हेगडे असं या चिमुकलीचं नाव असून, ती अवघी २ वर्षे १० महिन्यांची आहे. आणि इतक्या लहान वयात तिने तबल्यावर १ नाही, २ नाही तर संपूर्णच १२ वेगवेगळे ताल वाजवण्यासोबतच ते म्हणून दाखवले आहेत. तिच्या या कामगिरीची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे. तिचा तबला वाजवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com