
Khan Sir : 'खान सर' इतके फेमस का आहेत माहितेय? हा Viral Video एकदा पाहाच
khan sir in the kapil sharma show : लोकप्रिय यूट्यूबर आणि खान सर या नावाने प्रसिद्ध फैजल खान हे लवकपच कपील शर्मा शो मध्ये दिसून येणार आहेत. द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. या शो मध्ये असेही काही प्रसंग घडतात ज्यामध्ये पाहुण्यांच्या कथा लोकांना भावूक करून जातात. कपिलच्या शोचा (द कपिल शर्मा शो) टीझरचा व्हिडीओ असाच अनेकांना भावूक करून जाणारा आहे.
या वीकेंडला म्हणजे 7 जानेवारीला, सर्वात लोकप्रिय शिक्षकांपैकी एक असलेले खान सर, कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. मोटिव्हेशल स्पीकर गौर गोपाल दास, विवेक बिंद्रा, खान सर आणि गायक अल्ताफ राजा, श्वेता शेट्टी, शब्बीर कुमार आणि सुनीता राव या एपिसोडमध्ये दिसले. दरम्यान या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा: Sunil Shetty : बॉलिवूडचे स्टार मूग गिळून गप्प, सुनील शेट्टी मात्र बोलला; थेट योगींना सुनावलं…
या एपिसोडमध्ये खान सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल अशा गोष्टी सांगितल्या की अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. यूपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण असल्याचे सांगताना खान सर म्हणाले की, या अभ्यासक्रमाची वार्षिक फी अडीच लाख रुपये आहे. ही फी मी फक्त साडेसात हजार रुपये केली.
याचं करण त्यांनी यावेळी सांगितले. काही लोकांना साडे सात हजार ही खूप कमी रक्कम वाटेल पण ते म्हणाले की, एक मुलगी माझ्याकडं आली आणि म्हणाली सर प्लीज माझा क्लास सकाळी करा, मी का ते विचारले त्यावर तिने दिलेले उत्तर होतं की मला संध्याकाळी दुसऱ्याच्या घरी भांडी धुवायला जायचं असतं. हे ऐकून माझं हृदय तुटलं. हे ऐकूण कपील शर्मा देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा: Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच
पुढे खान सर म्हणाले की, एक मुलगा होता जो नदीतून वाळू काढायला आणि भरायला जायचा, आणि ती नाव वाळू किनाऱ्यावर आणून विकली जायची. त्यातून तो माझी फीस भरायचा. माझे हात कापायचे, मी कशी फीस घेणार त्याच्याकडून. त्याच दिवशी मी शपथ घेतली की, भारतातील मुलांच्या यशात पैसा कधीही अडथळा बनू देणार नाही.
खान सरांनी सांगितलेले विद्यार्थ्यांचे हे किस्से ऐकून कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंग भावूक झाले. सेटवर उपस्थित असलेले सर्वजण खान सरांसाठी टाळ्या वाजवू लागतात.
हेही वाचा: OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च! मिळतो दमदार प्रोसेसर अन् कॅमेरा, जाणून घ्या किंमत
फेमस होण्याचं कारण काय?
दरम्यान या शोमध्ये खान सरांनी त्यांच्या प्रसिद्धीचं कारण देखील सांगितलं ते म्हणाले की क्लासमध्ये मी विद्यार्थ्यांना नवीन कल्पना वापरून शिकवतो, ज्यामुळे त्यांचं लक्ष राहतं. मी कोणताही विषय खूप सोप्या, दररोजच्या बोलीत समजावून देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ते कंटाळवाणे वाटत नाही आणि त्यांना विषय देखील समजतो.