Viral Video: बिबट्या आला दारात, गावकऱ्यांनी कोंडलं घरात, पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Viral Video: बिबट्या आला दारात, गावकऱ्यांनी कोंडलं घरात, पाहा व्हिडिओ

एखादा बिबट्या आपल्या घरात घुसला अन् आपल्या समोर अचानक उभा राहिला तर काय होईल? कल्पना करूनच आपल्या अंगावर काटा उभा राहील पण अशी घटना आपल्या महाराष्ट्रात घडली आहे. एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करता करता एका घरात घुसला आहे. ही घटना साताऱ्यात घडली असून सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

(Leopard Enters In Home Viral Video)

साताऱ्यातील हेळवाकमध्ये ही घटना घडली आहे. कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या घरात घुसला होता. यावेळी शेतकरी रमेश कारंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे बिबट्या घरातच कोंडला गेला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचं तेथील नागरिकांकडून सांगण्यात येत असून हा व्हिडिओ अनेकांकडून शेअर करण्यात येत आहे. तर खेड्यात बिबट्यांची संख्या वाढल्याचं अलीकडील काही वर्षांत आढळलं आहे. त्यामुळे खेड्यात राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे.