
एका लग्न समारंभात विचित्र घटना समोर आली आहे. लग्नात स्टेजवर एका तरुणीने गोंधळ घातला. तिने दावा केला की तिचे नवरीसोबत ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होती. नवरीमुळे माझे तिनदा लग्न तुटले आणि आज ती स्वतः लग्न करत आहे. हे ऐकून उपस्थित लोक चकित झाले. दोघीमंध्ये बराचेवळ वादही झाला. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळानंतर नवरदेवाकडील लोकांनी हे लग्न मोडले. पोलिस पुढील तपास करत आहे.