
नारळाच्या झाडावर वीज कोसळून शेंड्याला लागली आग; घटना कॅमेऱ्यात कैद | Viral Video
काल (सोमवारी) अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागाला झोडपून काढलं आहे. तर अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून रस्त्यावर बर्फ साचला आहे. तर नारळाच्या झाडाला आग लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याचं दिसत असून नारळाच्या शेंड्यावर आग लागल्याचं दिसत आहे. ही आग एवढी भीषण होती की, लांबूनही या आगीचे लोळ उठताना कॅमेऱ्यात दिसत आहेत. स्थानिक लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे.
गारपीट, वादळी वारा आणि पावसानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलंय. आधीच कांदा, भाजीपाल्याला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यात आता अवकाळीची भर. कांदा, गहू, ज्वारी, केळी, पपई, द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय.