
Viral Video : मध्यरात्री 3 बिबटे थेट घरात घुसले; अंगावर काटा आणणारे CCTV Footage
जुन्नर : पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकदा शेतकऱ्यांवर किंवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार समोर येत असतात. तर सध्या तब्बल तीन बिबट्याने एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तीन बिबटे एका घरता घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर दारासमोर कार लवालेली असून तुळशी वृदांवन दारात दिसत आहे. एक बिबट्या थोड्या वेळाने तिथून पळ काढताना दिसत आहे.
दरम्यान, विवेक गुप्ता या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर जुन्नर तालुक्यात असे अनेक प्रकार होत असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री किंवा उसाच्या शेतात जाताना काळजी घेण्याचे अवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.