

सुट्टीच्या दिवशी नवरा बेडवर उशीरापर्यंत लोळत पडलेला असतो आणि बायको आठवडाभराची कामे उरकत असते.अनेकवेळा ओरडल्यावर नवरा जागेवरून उठतो अन् पुन्हा मोबाईल घेऊन बसतो. तेव्हाही बायको ओरडते, येता-जाता नवऱ्याला डिवचते. हे प्रत्येक घरातलं चित्र असतं. पण नवरा-बायकोची लुटूपुटूची भांडणं करण्याचा मोह जंगलाच्या राजा-राणीलाही आवरता आला नाही.