

Bihar Exam Protest Video : बिहारची राजधानी पटना इथं स्पर्धा परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याला जिल्ह्याधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संबधित जिल्हाधिकाऱ्यानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या थेट कानशिलात लगावल्यानं इतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत वाढला आहे. या असंतोषाला या प्रकारामुळं वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण गेल्याकाही दिवसांपासून या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे.