Viral : चिमुकला कुत्र्यासोबत खेळतोय बेसबॉल; IAS अधिकाऱ्याने शेअर केला Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Viral : चिमुकला कुत्र्यासोबत खेळतोय बेसबॉल; IAS अधिकाऱ्याने शेअर केला Video

आपल्या आयुष्यात अनेक मित्र असतील पण त्यातील संकटकाळी मदत करणारे किती आहेत? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. कारण आयुष्यात आनंद घ्यायचा असेल तर मोठ्या गँगची गरज नाही, फक्त एकदोन खऱ्या मित्रांची गरज असते. असाच एका कुत्र्याचा आणि एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा कुत्र्यासोबत बेसबॉल खेळत आहे. मुलगा बॉल मारतो आणि लांब गेलेला बॉल कुत्रा घेऊन येत आहे. या दोघांची मैत्री आपल्याला खूप काही शिकवून जाते. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे.

आपल्याला आयुष्यात आनंद घ्यायचा असेल तर मोठ्या गँगची गरज नाही, फक्त एकदोन खऱ्या मित्रांची गरज असते असं कॅप्शन त्यांनी आपल्या व्हिडिओवर शेअर केलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा व्हिडिओ शेअर केला आहे.