Viral Video : शाळेत जाताना स्कूटीवरच मांडी घालून बसला मुलगा; आपलेही मुलं असं करतात का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : शाळेत जाताना स्कूटीवरच मांडी घालून बसला मुलगा; आपलेही मुलं असं करतात का?

लहानपणी शाळेत जाताना आपण बरेच वेगवेगळे प्रयोग केले असतील. आपल्यापैकी अनेकजण सायकलवर शाळेत गेले असतील. तर मित्रांसोबत शाळेत जाताना आपण अनेकदा भांडणेदेखील केले असतील. तर सध्या मुलांना पालकांकडून गाडीवर शाळेत सोडलं जातं. अशात एका शाळेत जाणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचं आपल्याला दिसत आहे. तर मुलगा पाठीमागे आडवं बसून मांडी घालून बसल्याचं आपल्याला दिसतंय. गाडी थोडी जरी हलली तरी हा मुलगा गाडीवरून पडू शकतो अशी ही परिस्थिती आपल्याला व्हिडिओत दिसतेय.

दरम्यान, आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना ते काय करतात याकडे पालकांचे लक्ष असायला पाहिजे. असे प्रयोग मुलांच्या जीवावर बेतू शकतात याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी. हा व्हिडिओ २ लाख ७० हजार लोकांनी लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :schoolstudentviral video