Video Viral : आईची माया मित्राकडून मिळाली! या चिमुकल्याने नेमकं काय केलं? | little boy lending his shoulder to sleepy friend Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : आईची माया मित्राकडून मिळाली! या चिमुकल्याने नेमकं काय केलं?

आयुष्यात आईचे प्रेम सर्वांनाच मिळते. पण काहींना मायेच्या ममतेपासून वंचित रहावं लागतं. पण आईचे प्रेम मिळायलाही नशीब लागते असं म्हणतात. काही जणांना आईचे प्रेम हे इतरांकडूनही मिळत असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मित्र त्याच्या मित्राला कशा प्रकारे खांदा देतो ते पाहा.

(little boy lending his shoulder to sleepy friend Viral Video)

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन चार मुले एका रांगेत बसलेले आहेत. तर त्यातील एका मुलाला झोप लागली आहे. मुलगा डुलकी मारत आहे, तर त्याकडे शेजारी बसलेल्या मित्राचे लक्ष जाते आणि तो त्याच्या मानेला धरून आपल्या खांद्यावर ठेवतो. त्यानंतर तो शांतपणे मित्राच्या खांद्यावर झोपी जातो. हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हालाही नक्कीच आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सध्या या क्यूट मुलांचा व्हिडिओ अनेकांकडून शेअर करण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :motherSleep viral video