अवघ्या दोन वर्षाचा चिमुकला देतोय 'भारत माझा देश'चे धडे; पाहा Viral Video

Viral
ViralSakal

मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम आपल्यासाठी अवघड नसते. तसेच कोणतेच काम करण्यासाठी वय आडवे येत नाही याचं जिवतं उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेल्या अवघ्या दोन वर्षाच्या बालकाचा हा व्हिडिओ. अवघ्या दोन वर्षाचा बालक प्रतिज्ञा शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून या बालकाचा आपल्यालाही अभिमान वाटेल.

जवळपास दोन वर्षाच्या मुलगा शाळेतील टेबलावर बसून मुलांच्या पुढे प्रतिज्ञा म्हणत आहे आणि वर्गातील बाकीचे मुले त्याच्या पाठीमागे प्रतिज्ञा म्हणत आहेत. विशेष म्हणजे या चिमुकल्याची सगळी प्रतिज्ञा पाठ आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या चिमुकल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अवघ्या दोन वर्षाच्य मुलाची प्रतिज्ञा पाठ असल्यामुळे आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हा व्हिडिओ कोणत्या शाळेतील आहे ही माहिती अजून समोर आली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com