Video : स्नोबोर्डिंग करताना चिमुकलीची संगीत उजळणी; पुढे गेली अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video : स्नोबोर्डिंग करताना चिमुकलीची संगीत उजळणी; पुढे गेली अन्...

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. स्नोबोर्डिंग करताना चिमुकली गाणं गात असताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

(Little Girl Sings While Snowboarding Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक मुलगी स्नोबोर्डिंग करताना दिसत आहे. तर बर्फाळ प्रदेशातील हा व्हिडिओ तिच्या वडिलांनी शूट केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्हडिओत ती घसरत जाताना १ ते १० पर्यंत आकडे म्हणत म्हणत गाणे गात आहे. बरंच पुढं गेल्यानंतर ती घसरून पडताना आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओला 100 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुलगी फक्त पाच वर्षाची असल्यामुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. तर हा व्हिडिओ अनेककांकडून शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :childrenviral video