

Viral Video:
Sakal
Maha Shivratri 2026 Viral Video: हिंदी गाण्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक परदेशी लोक हिंदी बोलायला किंवा हिंदी गाणी गाणे शिकले आहेत आणि सोशल मीडियामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. अशाच एका परदेशी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. जो भारतीयांच्या मनात घर करत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी भगवान शिवाला समर्पित हिंदी भक्तीमय गीत गाताना दिसत आहे. तिचा स्पष्ट उच्चार, भावनिक आवाज आणि भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर याने सोशल मीडियावर यूजर्संची मने जिंकली आहेत.