

Dev-Danav symbolic fire war tradition during Shimga Festival in Gavala Aali, Mahad, showcasing Konkan’s unique Holi celebration ritual.
esakal
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. होळीच्या सणाच्या अनेक पंरपरा आहेत. कोकणातही हा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. रायगडमधील महाड शहरातील शिमगोत्सव (होळी) नेहमीच आगळा-वेगळा आणि रोमांचक असतो. तंत्रज्ञानाच्या या युगातही गवळआळीतील प्राचीन परंपरा आजही जिवंत आहे. होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर होणारे 'देव-दानव युद्ध' हे शहरातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि साहसी खेळाची पंरपरा आजही सुरु आहे.