Maharashtra Din 2023 : 'घाटामाथ्यावरील उटी' म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एव्हरग्रीन हिल स्टेशन

हे ठिकाण कोणते आणि या ठिकाणी जायचं कसं ते आपण जाणून घेऊया
Maharashtra Din Special Ambah Ghat
Maharashtra Din Special Ambah Ghatesakal

Maharashtra Din 2023 : आठवड्यात लाँग विंकेंड असणार आहे असं कळताच प्रत्येकजण कुठेतरी जाण्याचा विचार करत असतो. तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी जायची आवड असेल तर हे स्थळ तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या ठिकाणाला एव्हरग्रीन हिल स्टेशन असेही म्हणता येईल. कारण बाराही महिने हे ठिकाण अगदी थंड असते. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण असल्याने येत्या १ मे ला सुद्धा तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. तेव्हा हे ठिकाण कोणते आणि या ठिकाणी जायचं कसं ते आपण जाणून घेऊया.

आज आपण 'आंबा घाट' या स्थळाबाबत जाणून घेणार आहोत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील महाबळेश्वरपाठोपाठ बाराही महिने थंड हवेसाठी 'आंबा गिरिस्थान' प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 750 मीटर उंचीवर असलेले हे पर्यटनस्थळ घाटमाथ्यावरचे उटी म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी फक्त हिवाळ्यातच जावं असं काही नाहीये. तर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींसोबत तुम्हाला हव्या त्या वेळेत हव्या त्या ऋतूत या ठिकाणी एन्जॉय करण्यास जाऊ शकता. येथील हिरवंकंच निसर्गसौंदर्य बघून तुम्ही प्रेमात पडाल.

Maharashtra Din Special Ambah Ghat
Maharashtra Din Special Ambah Ghat

कोल्हापूर रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासाचा मध्यबिंदू असलेल्या आंबा गिरिस्थानात दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील कातीव कडे आणि घाटातील हजारो फूट खोल दऱ्याचे दृश्‍य अंगावर शहारे आणते. निसर्ग सौंदर्याने नटलेला वेडावाकडा घाट पर्यटकांना कायम भुरळ घालतो. - येथे गव्यांसाठी राखीव जंगल क्षेत्र आहे. अंबेश्वर देवराई, कोकण पॉइंट, वाघझरा, सडा, निसर्ग माहिती केंद्र, सनसेट पॉइंट, विसावा पॉइंट, नालाच्या आकाराचे चक्रीवळण, गायमुख, मानोली जलाशयातील बोटिंग, सासनकडा ही ठिकाणे मनाला मोहवून टाकतात. किल्ले विशाळगडाकडे जाणारा आंबा ते केंबुर्णेवाडी हा सोळा किलोमीटरचा दाट जंगलातील प्रवास पर्यटकांना आकर्षित करतो.

Maharashtra Din Special Ambah Ghat
Maharashtra Din Special Ambah Ghat

या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ

या ठिकाणी तसे तर बाराही महिने थंड वातावरण असते. परंतु तुम्हाला थंडीचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला जानेवारी महिन्यात मनमोहक दृष्य देऊ शकते.

घाटात वाहन चालवताना घ्यावी विशेष काळजी

जानेवरी महिना - अतिशय सुंदर घाट असल्याने घाटात वाहने चालविताना विशेषतः पावसाळ्यात काळजी घ्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. घाटात खोल दऱ्या असल्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी करू नये. निसरडी वाट किंवा आडवळणाचा मार्ग टाळावा. निसर्ग ठिकाणांचे विद्रुपीकरण अजिबात करू नये. (Hill Station)

Maharashtra Din Special Ambah Ghat
Maharashtra Din : वैनगंगेच्या काठी असलेल्या या पवित्र ऐतिहासिक ठिकाणाला मार्कंडा नाव कसे पडले?

जून ते ऑक्टाेबर या कालावधीतसुद्धा पावसाळा असल्यामुळे चोहोबाजूंनी हिरवा शालू पांघरलेले हिरवेगार निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवता येते. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजता येते. काजव्याची अनोखी दुनिया अनुभवावयास येते. एप्रिल ते जून या कडक उन्हाळ्याच्या कालावधीत येथे पर्यटकांना गारवा मिळतो. रानमेवा चाखावयाला मिळतो. (Amazing Tourist Places)

Maharashtra Din Special Ambah Ghat
या अमेझिंग Tourist Placesवर घालवा एप्रिल मंथचे लाँग विकेंड

मे व जून महिना - करवंदे, जांभळे, आंबे, फणस, तोरणे, नेर्ली, काजू असा रानमेवा तुम्हाला प्रत्यक्षात बघायचा असेल तर जून महिन्याचा पहिला पंधरवडा येथे जाण्याचा उत्तम काळ ठरू शकतो. येथे काजव्यांची अनोखी दुनियासुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान येथे मलबारी साप बघायला मिळतो. रानफुले व रानभाज्यांचा हंगाम असतो. हिवाळा व उन्हाळा या ऋतूत हॉर्नबिल व स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचे दर्शन घडते. दसऱ्याच्या वेळी ग्रामदैवत अंबेश्वर देवाचा मोठा जागर येथे असतो. (Maharashtra)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com