Maharashtra Police Drive Pregnant Woman
esakal
Maharashtra Police Drive Pregnant Woman to Hospital After Drunk Husband : सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत पोलीस कर्मचारी गाडी चालवत एका गर्भवती महिलेला रुग्णालयात ( Hospital ) नेताना दिसत आहे. या व्हिडीओची (viral video ) जोरदार चर्चा सुरु आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील ( maharashtra police) कोणत्या शहरातील आहे, याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही.