Mahendra Rajbhar slapped by Brijesh Rajbhar viral video : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील सुहेलदेव स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र राजभर यांच्यावर त्यांच्याच एका कार्यकर्त्याने हल्ला केला आहे. हार घालण्याच्या बहाण्याने कार्यकर्ता बृजेश राजभर याने महेंद्र राजभर यांना कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याची जोरदार चर्चा सुरू आहे. बृजेश राजभर याच्याविरुद्ध जलालपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.